नवापूर । तालुक्यातील नवी सावरट जवळील सुरत-नागपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोलिस गाडी व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमध्ये भाजपचे नवापूर तालुका सरचिटणीस समीर दलाल (वय-45) त्यांचे मित्र इम्रान यांचा समावेश आहे. समीर दलाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. समीर दलाल यांना सुरत येथे हलविण्यात आले असुन सुरत येथे उपचार सुरु आहेत तर इम्रानला धुळे येथे हलविण्यात आले आहे.
तत्काळ रूग्णालयात दाखल
उपजिल्हा रुग्णालयात पोलिस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी येऊन जखमीची माहीती घेऊन डॉक्टरांशी चर्चा केली आज सकाळी समीर व मित्र इम्रान यांनी काँलेज रोडवरील नास्ता सेंटरवर मेंदुवडाचा नास्ता करुन दोघ दुचाकीने चिंचपांडा येथे कामा निमित्त जात होते. समीर दलाल आणि इम्रान हे दोघे नवापूरहून नंदुरबारकडे जात होते. त्याचवेळी नंदुरबारहून पोलिस मेकॅनिकल पथकाचे पोलीस वाहन नवापूरकडे येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. पोलिस वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिका फोन करून डॉ. सोनवणे, पायटल लाजरस गावित यांनी तत्काळ उपचारासाठी नवापूर रूग्णालयात नेले.
हेल्मेट वापरण्याचा सल्ला
जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई शिरीष नाईक व जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित यांनी नंदुरबार जात असताना घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली.वैद्यकीय अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीने उपचार करण्याचे सांगितले महामार्गावरील तरूणांना व मोटरसायकल स्वार यांना हेल्मेट परिधान करण्याच्या सल्ला दिला. रजनी नाईक यांनी सांयकाळी फोन करुन जखमींची विचारपूस देखील केली.
काही काळ वाहतूक ठप्प
नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी घटनेची पाहणी केली त्यानंतर पंचनामा करण्यात आला.काही तास महामार्ग क्रमांक सहा वाहतूक ठप्प झाली.नवापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे. महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असुन अनेकांचे बळी जात आहे वाहन चालकांना हेल्मेंट सक्तीचे करणे बंधनकारक करावे ती सवय लाऊन घेणे महत्त्वाचा आहे महामार्गावर अनेक बोधप्रद वाक्य लिहलेले असतात पण त्यापासून आपण काही बोध घेत नाही अपघाताची माहीती होताच अनेक भाजप पदाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली, समीरचे मित्र मंडळी यांनी मदत कार्य केले. तसेच मुस्लीम नेते रऊफ शेख यांनी सुध्दा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन समीर व इम्रान यांना तातडीने मदत कार्य करुन सहकार्य केले.