वेलफेअर असोसिएशनची घोषणा
रावेत : राज्यासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील पोलिसांसाठी पोलिस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन आरोग्य तपासणी, बंदोबस्तासाठी स्वयंवसेवकांची मदत असे अनेक उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील पोलिसांसाठी बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने स्वस्तातील घरे उपलब्ध करून देणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये ही घरे असणार आहेत, असे पोलिस वेलफअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी सांगितले.
सद्यस्थितीत पोलिसांना नवीन घर घेणे अवघड व जिकिरीचे झाले आहे. तसेच त्यांचा वेळ व पैसा वाचावा, त्यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये आपले स्वत:चे घर असावे या संकल्पनेतून फक्त पोलिसांसाठीच असोसिएशनने ही योजना सादर केली आहे. अल्प दरात 441 स्क्वेअर फूट एरिया व सर्व सोयीसुविधा असणारे हे घर असेल. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये या योजनेची सविस्तर माहिती कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, शहराध्यक्ष भावेश दाणी, उपाध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल गाडेकर, उपाध्यक्ष योगेश बोराटे, शुभम चिंचवडे, संघटक सुभाष मालुसरे, तेजस खेडेकर, मयुरेश मडके, प्रमोद नेवे यांच्यावतीने देण्यात आली आहे.