हडपसर । पोलीस खात्यामध्ये काम करीत असताना पोलीस कर्मचार्यांवर ताण-तणाव तर असतोच, परंतु सण-उत्सवाच्या काळात हा ताण अधिक वाढतो. सध्या पोलीस कर्मचाजयामंध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त दिसून येते. अनेकदा हे आजार तपासणी केल्यानंतर समजतात. परंतु अनेक कर्मचा-यांना हे आजार पूर्वीपासून माहिती असताना देखील त्यावर योग्य काळजी त्वरीत घेतली जात नाही. नंतर त्या आजारांचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. त्यामुळे पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याबाबतचा दृष्टीकोन बदलत आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले.
पुणे शहर पोलीस परिमंडळ 1 च्यावतीने निरंजन सेवाभावी संस्थेने गणेशोत्सव काळात मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर व कार्यकर्त्यांचा सन्मान डॉ.तेली यांच्या हस्ते करण्यात आला. फरासखाना पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमाला डॉ. आनंद बलदोटा, डॉ. मनोरमा यादव, डॉ. नम्रता यादव, डॉ. जगदीश चापोलीकर, रंजन कुमार, सोनू शेंडे, डॉ. स्मिता भोयर, जयेश कासट, संदीप पारख, अजय इंवर, ब्रम्हानंद लाहोटी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. तेली म्हणाले, पोलीस कर्मचाजयांना कामावर असतना अनेकदा आहाराचे पथ्यपाणी पाळणे शक्य नसते. परंतु त्यासाठी त्यांनी स्वत:मध्ये बदल करीत आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उत्सवाच्या काळात निरंजन सेवाभावी संस्थेसारख्या अनेक संस्था पोलिसांसोबत कार्य करीत असतात.
Prev Post