पोलिसांवर हल्ला करणार्‍या इराणी महिलेस तब्बल दोन वर्षांनी अटक

0

भुसावळ। धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवणार्‍या टोळीतील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणार्‍या इराणी महिलेस तब्बल दोन वर्षानी पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आल़े शब्बो जबीनअली ईराणी (वय 30, रा. भुसावळ) या महिलेस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

2015 मध्ये मुजायदीन उर्फ बावडू छोटू इराणी या आरोपीस पकडण्यासाठी बाजारपेठ पोलिसांचे पथक इराणी वस्तीत गेल्यानंतर शब्बो इराणीसह अन्य महिलांनी पोलिसांवर हल्ला केला होता़ या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा घडल्यानंतर महिला आरोपी पसार झाल्या होत्या़ शुक्रवार 2 रोजी ही महिला रावेर येथे बाजारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलीस कारवाईचा सुगावा लागताच ती रेल्वेने भुसावळात पसार झाली मात्र शनिवार 3 रोजी दुपारी रेल्वे स्थानक परीसरात तिला अटक करण्यात आली़. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक शंकर पाटील, प्रवीण पाटील, आनंदा भोर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आश्विनी इंगळे आदींच्या पथकाने हि कारवाई केली़.