जळगाव । नागरिकांच्या तक्ररींचा निपटारा करण्यासाठी तसेच सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या ई-तक्रार केंद्राचे गुरूवारी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, डिवायएसपी सचिन सांगळे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे, अंगत नेमाणे, खंबाट आदी पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सुविधा केंद्रात सिटीझन पोर्टलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नागरिकांचा करता येणार तक्रार
या पोर्टलद्वारे नागरिकांना हरविलेल्या व्यक्ती, फरार आरोपी, अनोळखी मृतदेह अटक आरोपी याबाबतची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच नागरिकांना या पोर्टलच्या सर्व्हिसेसमधून आपले युझर आयडी व पासवर्ड टाकून कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. अशी सुविधा यातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी केल्या तक्रारींची तात्काळ दखल घेत त्या अडचणी पोलिस सोडवतील. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केली आहे.