पाचोरा। आगामी काळात येवु घातलेल्या पोळा, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव व बकरी ईद हे उत्सवा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस पाटलांनी प्रत्येक गावात नागरिकांच्या बैठका घेवुन शांततेविषयी आव्हान करावे. गावात काही समाज विध्वंसक व्यक्ती अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नही करत असतील तर तातडीने पोलिसांना कळवुन पोलिस प्रशासनाचे दुत म्हणून कार्य करावे असे आव्हान पाचोरा भागाचे पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड यांनी केले. पाचोरा येथील पोलिस ठाण्यात भविष्यात येवु घातलेल्या सण उत्सवात सतर्कतेच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे, वरिष्ठ पोलिस उपनिरिक्षक अविनाश आंधळे, संदिप पाटील, सचिन सानप उपस्थित होते.
सण- उत्सवात शांततेचे आवाहन
पोलिस पाटील हे गावा आणि पोलिसांमधील दुवा असल्याने स्थानिक पातळीवर पोलिस पाटलांना संपुर्ण गावाची सखोल माहीती असते. यामुळे पाटलांनी सण उत्सव काळात आणि अतिवृष्टीच्या काळातही सतर्क राहुन पोलिस प्रशासनास कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासंदर्भात सहकार्य करावे. यावेळी पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पो.उपनिरिक्षक अविनाश आंधळे यांनीही मार्गदर्शन व सुचना केल्या. कार्यक्रमास गुप्त यंत्रणा विभागाचे हवालदार नितीन सुर्यवंशी, प्रकाश पाटील, गजु काळे, राहुल बेहरे, राहुल सोनवणे, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव राठोड, कार्याध्यक्ष भारती बेंडाळे, राहुल देशमुख, प्रताप ठाकरे, रमेश पाटील, उषाबाई पाटील, विनोद पाटील, एकनाथ कोळी, तुकाराम तेली सह तालुकाभरातील पोलिस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सचिन सानप यांनी केले.