पोलिस बॅण्ड पथकाच्या देशभक्तिपर गीतगायनाने रसिक मंत्रमुग्ध

0

जळगाव। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘भाऊंच्या उद्यानात’ पोलिस बॅण्ड पथकाने सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांच्या सुमधूर आणि रोमांचकारी सुरावटींनी जळगावकरांची सायंकाळ स्वरमय झाली. यावेळी उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. दरम्यान, जैन इरिगेशनच्या भारतातील विविध आस्थापनांमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘भाऊंच्या उद्याना’मध्ये पोलिस बॅण्ड पथकाची देशभक्तिपर गीतांची मैफल आयोजित करण्यात आली होती.

या मान्यवरांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी सपत्नीक मैफलीचा आनंद घेतला. याप्रसंगी जैन फार्म फ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, कॅप्टन मोहन कुळकर्णी, मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, फारुख शेख यांची उपस्थिती होती. दरम्यान सकाळी पी. आर. सिंग यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी कॅप्टन मोहन कुळकर्णी यांच्यासह सहकारी उपस्थित होते. ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतासह विविध वाद्यमेळ्यांवर तालबध्द पध्दतीने पोलिस बँण्ड पथकातील कलावंतांनी प्रारंभ केला. अनेक गाजलेल्या हिंदी-मराठी गीतांच्या सुरेख समर्पक सुरावटींची गुंफण करीत पथकाने सादरीकरण केले. याप्रसंगी उपस्थित रसिकांनी दाद दिली.

जैन इरिगेशन
जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथे संघपती दलीचंद जैन यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मार्केटिंग विभागाचे महाराष्ट्र प्रमूख अभय जैन यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ सहकारी उपस्थीत होते. फूड पार्क आणि एनर्जी पार्क येथे फार्म फ्रेशवे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अजित जैन यांच्यासह सहकारी उपस्थित होते. ग्रीपार्क आणि गांधी तीर्थ येथे कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उद्य महाजन उपस्थित होते. टाकरखेडा येथील टिश्युपार्कमध्ये आनंद गुप्ते यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सर्व आस्थापनांमध्ये सकाळी आठला ध्वजारोहण करण्यात आले.

अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळा
अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेमध्ये जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अजित जैन, प्राचार्य जे. पी. राव यांच्यासह शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी उपस्थित होते. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ. शेखर रायसोनी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शोभना अजित जैन, अविनाश जैन, प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिरीष जैन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ. अनिल ढाके यांच्यासह शाळेतील सहकारी उपस्थित होते.