पोलिस स्थापना दिनानिमित्त धुळ्यात पोलिसांतर्फे जनजागृती रॅली

0

धुळे- महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (रेझिंग डे) निमित्त मंगळवारी धुळे पोलिस दलातर्फे शहरांतील प्रमुख मार्गाने जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलिस मुख्यालयात शालेय विद्यार्थी व नागरीकांना पोलिस दलाचे कामकाजाविषयी पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे व अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी अवगत करून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पोलिस दलातील वापरण्यात येणार्‍या शस्त्राची माहितीदेखील देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशिक टीमने आधुनिक उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिके करून दाखविले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, होम डीवायएसपी रवींद्र सोनवणे तसेच धुळे शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.