पोलीसाला शिवीगाळ केल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा

0

जळगाव – जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैदीने त्याठिकाणी बंदोबस्तला असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करीत त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या कैद्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जिल्हा कारागृहात अमळनेर येथील राज वसंत चव्हाण हा आरोपी बंदिस्त म्हणून आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राज चव्हाण हा कारागृहाच्या आवारात फिरत असल्याने त्याठिकाणी बंदोस्तासाठी तैनात असलेले कुलदीप सुंदर वराडे हे होते. यावेळी कैदी कारागृहाच्या बाहेर फिरत असल्याने कुलदीप वराडे यांनी त्या आरोपीला कारागृहात जाण्यासास सांगीतले असता. त्याचा राग येवून राज चव्हाण याने पोलिस कर्मचार कुलदीप वराडे यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी कुलदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात राज चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मनोज वाघमारे हे करीत आहे.