शहादा। कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे.संचारबंदी दरम्यान वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी करत पत्रकारांचे थर्मल स्कॕनिंग केले.
कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.भारतात त्याचा प्रसार रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. पत्रकार महत्वाची भूमिका बजावतात, यासाठी दररोज वार्तांकनासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागते. जिल्ह्यात सुदैवाने कोरोनाची लागण नसली तरी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. दररोज वार्तांकनासाठी घराबाहेर पडणाऱ्या पत्रकारांची थर्मल स्कॕनिंग पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी केली. यात स्कॕनिंग केलेल्या सर्व पत्रकारांचे शरीराचे तापमान समतोल असल्याने आपण सर्व पत्रकार सुरक्षित असल्याचे सपकाळे यांनी सांगून स्वतःची काळजी घेत आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले.