पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे रस्त्यावर

जळगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गुरुवारी शहरातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुलांची पाहणी केली. यावेळी अनावश्यक सुरु असलेल्या दुकानांवर त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना केली. याच बरोबर नागरिकांकडून निर्बंधांचे पालन होते आहे कि नाही याचाही आढावा घेतला.

जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर आज ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सुभाष चौक, गांधी मार्केट, फुले मार्केट, दाणबाजार, गोलाणी मार्केट परिसरात पाहणी केली. याप्रसंगी उपायुक्त संतोष वाहूळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. विठ्ठल ससे, पोहेकॉ विजय निकुंभ यांच्यासह महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.