पोलीस उप-अधीक्षक सचिन सांगळे यांची लातूरला बदली

0
जळगाव  – जळगावचे पोलिस उप अधिक्षक सचिन सांगळे यांची लातूर शहर उपविभागच्या पोलीस उप अधीक्षक पदी बदली झाली आहे. राज्यातील 23 उप अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. सांगळे यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती नाही. नाशिक जात पडताळणी विभागाचे पोलीस उप-अधीक्षक पुंडलिक सपकाळे यांची नंदुरबार विभागातील शहादा विभागाच्या उप अधीक्षकपदी बदली झाली आहे.