पोलीस कर्मचार्‍यांमध्ये हुज्जत; चर्चा रंगली

0

जळगाव । शहरातील मुंदडा नगरात सुरु असलेल्या बांधकामा ठिकाणावरून सिमेंट चोरीला गेल्याने बिल्डरने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिस स्टेशनमधील एका कर्मचार्‍याने याठिकाणी धाव घेवून एका संशयिताला पोलिस स्टेशनमध्ये आणले. दरम्यान संशयित पोलिसाचे वडील असल्याने पोलिसांनेच पोलिसाच्या कानशिलात लगाविल्याची घटना दुपारी रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या आवारात घडली.

रामानंद पोलिसात एकमेकांविरुध्द तक्रार
मुंदडा नगरात एका बिल्डरचे बांधकाम सुरू असून या कामावर पोलीस कर्मचार्‍यांचे वडील कार्यरत आहेत. या कामावरुन एक महिला पिशवीतून सिमेंट चोरून घेऊन जात असताना बिल्डर तसेच अन्य कर्मचार्‍यांनी त्या महिलेला पकडले. महिलेस त्यांनी विचारणा केली असता याच बांधकामावर कार्यरत असलेल्या पोलिसाच्या वडिलांच्या सांगण्यावरून सिमेंट नेत असल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर महिलेला व संबंधित माणसाला बिल्डरने रामानंद नगर पोलिसात आणले. दरम्यान वडिलांना बिल्डरने पोलीस स्टेशनला नेले, अशी माहिती मिळाल्याने पोलिस कर्मचार्‍याने थेट रामानंदनगर पोलीस स्टेशनला धाव घेतली. याठिकाणी पोलीस तसेच बिल्डर यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. याचवेळी दुसर्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने वर्दीवर असलेल्या कर्मचार्‍याच्या अंगावर हात टाकत त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍याने हुज्जत घालणार्‍या पोलिसाविरुध्द तक्रार दिल्याचे समजते.