पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव । शहरातील शिवकॉलनीत राहणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांने घरात कुणीही नसतांना आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत रामानंद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, रूपेश विश्‍वनाथ पाटील (वय-33) रा. शिवकॉलनी हे पोलीस दलात नोकरीला आहे. त्यांची ड्यूटी यावलला एक महिन्यापुर्वी बदली झाली होती. शिवकॉलनी येथे राहत्या घरात दोरीन गळफास घेवून आत्महत्या केल्याची मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आले.