पिंपरी-चिंचवड : पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन व शारंगधर फार्मा प्रा.लि यांच्या वतीने पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. पोलीस लाईन, कावेरी नगर,वाकड येथे आयोजित शिबिरास स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष गजानन चिंचवडे,वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र चव्हाण, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, हरीष मोरे, डॉ.गौरी अभ्यंकर, डॉ. विजय पुरा, डॉ. रश्मी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आरोग्याकडे दुर्लक्ष
पोलिस निरीक्षक चव्हाण म्हणाले की, पोलीसांचे जीवन अत्यंत धावपळीचे असते. त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या दोन्ही संस्थांनी हा उपक्रम राबवून पोलीस व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी उचलून आमचा भार हलका केला आहे. नाना शिवले म्हणाले की, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, पोलीसांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.चिंचवडे म्हणाले, की आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून हा कार्यक्रम हाती घेतला आहे. सैनिकांसाठीही असा उपक्रम राबविणार आहोत.
यांनी केले संयोजन
अतुल राऊत, शुभम चिंचवडे,युवराज चिंचवडे,किरण गांधी,तेजस खेडेकर, सहदेव गायकवाड,जनक ठक्कर, प्रमोद नेवे, मंगेश शेलार, वैभव घोटकुले,विशाल तांबे,कानजी चौधरी आदींनी संयोजन केले.