पोलीस झोपलेले असतांना खेड पोलीस कोठडीतून दोन आरोपी पळाले

0

खेड : पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन खेड पोलिस कठडीत चोरीच्या घटनेतील आरोपी इमारतीतील खिडकीचे गज कापून आरोपी पळाले आहे. आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे.

साथीदारांच्या मदतीने पलायन केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. झोपलेल्या पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरु असून विशाल दत्तात्रय तांदळे वय २२, रा मंचर, ता आंबेगाव जि. पुणे व राहुल देवराम गोयेकर, वय २६, रा. गोयेकरवाडी ता. कर्जत, जि. अहमदनगर अशी दोन आरोपींची नावे आहेत.