पोलीस पतीने आपल्या वाढदिवशी पत्नीला जीवे मारले

0

पतीसह सासरच्यांविरोधात विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल

जळगाव । पत्नीला नोकरी लावण्यासाठी तिलाच तिच्या माहेरुन 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली ते दिले नाही म्हणून तिच्या चारित्र्यांवर संशय घेवून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. याच कारणांमुळे पोलीस कर्मचारी पती प्रशांत प्रकाश पाटील, सासरे प्रकाश पंडीत पाटील व सासू प्रतिभा पाटील या तिघांनी भाग्यश्री प्रशांत पाटील वय 26 या विवाहितेचा खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. सासरच्यांनी माहेरच्या नातेवाईकांना भाग्यश्रीने आत्महत्या केल्याचे कळवून, मृतदेह जिल्हा रुग्णालयता दाखल केला होता. अखेर सायंकाळी माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या नातेवाईकांविरोधात खुनाचा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पावित्रा घेतला. त्यानुसार रात्री भाग्यश्री हिचे वडील अरुण जगन्नाथ पाटील रा. शिवप्रताप कॉलनी, देवपूर धुळे याच्याफिर्यादीवरुन पतीसह सासरच्या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला.

काय आहे फिर्याद
जानेवारी 2016 मध्ये भाग्यश्री हिचा प्रशांत पाटील याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस तिला चांगले वागविले. यानंतर भाग्यश्रीला तु एमएमबीएड झाली असून नोकरी लावून देण्यासाठी माहेरुन 25 लाख रुपये घेवून ये अशी मागणी केली. सदरचा प्रकार भाग्यश्रीने आई वडीलांना कळविला. मात्र वडीलांनी भाग्यश्रीला माहेरच्या हलाखीची परिस्थिती असल्यानेय 25 लाख देवू शकत नाही, असे कळविले होते. पैसे दिले नाही म्हणून सासरच्यांनी भाग्यश्रीला मारहाण करत तसेच तिच्या चारित्र्यांवर संशय घेवून तिला शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तिला रक्षाबंधनला सुध्दा पाठविले नाही.त्यामुळे भाग्यश्री 25 लाख रुपये देवू शकली नाही म्हणून तिला तिचे पती प्रशांत पाटील, सासरे प्रकाश पंडीत पाटील व सासू प्रतिभा पाटील या तिघांनी शारिरीक व मानसिक छळ करत गळफास देवून जीवे ठार मारले, अशी फिर्याद मयत भाग्यश्री हिचे वडील अरुण जगन्नाथ पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन तिघांविरोधात भादंवि कलम 302, 504, 506 व 34 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक राजकुमार ससाणे हे करीत आहेत.

मयत भारती हिचे धुळे जिल्ह्यातील सैंदाणे माहेर आहे. वडील अरुण जगन्नाथ पाटील, आई प्रमिला, दोन बहिणी जयश्री व राजश्री, व भाऊ निलेश असा परिवार आहे. दोन्ही बहिणी व भावाचे लग्न झाले आहे. वडील पावभाजी गाडी लावून उदरनिर्वाह भागवितात. घटनेची माहिती मिळाल्यावर जळगावातील भारतीचे हिचे शहरातील रहिवासी काका राजेंद्र पाटील यांनी नेहरुनगर गाठले. पोहचल्यावर त्यांना मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळाले. त्यांनी याबाबत भारतीचे वडील यासह बहिणी, मेव्हणे यांना प्रकार कळविला. त्यानुसार धुळ्यासह ठिकठिकाणांहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली.

दोन दिवसांपूर्वी मोठ्या बहिणीला केला होता फोन
भारती हिची मोठी बहिण जयश्री ही चोपड्याला नांदते. ती शिक्षिका आहे. भारती वडीलांना आप्पा म्हणायची. सोमवारी शाळेत ड्युटीवर असतांना मोठी बहिणी जयश्रीला भारतीने मोबाईलवरुन फोन केला होता. यावेळी तिने आप्पांना माझ्या घरी पाठवून दे असे सांगितले होते, शाळेत व्यस्त असल्याने थोडेच बोलणे झाले यानंतर भारतीचाही फोन आला नाही, आणि मीही तिला फोन केला नाही, यानंतर बुधवारी थेट तिच्या आत्महत्येची बातमी मिळली, असे जयश्री हिने पत्रकारांशी बोलतांना सांगिलते. हे सांगत असताना जयश्रीसह राजश्री या दोन्ही बहिणींना अश्रू अनावर झाले होते. तिला नेमके फोनवर काय सांगायचे होते किंवा तिने आप्पांना का घरी बोलावले होते? हे प्रश्‍न उपस्थित करत जयश्री आक्रोश करत होती.

गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह न घेण्याचा पावित्रा
आम्हाला कुठल्याही प्रकारचे भांडण अथवा वाद घालायचा नाही. कायदेशीर पध्दतीने लढाई लढू, तिच्या अंगावरील खुणा तसेच व्रण यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिला गळा आवळून मारण्यात आले असल्याचे भाग्यश्रीचे चुलत भाऊ अ‍ॅड. महेश सोनवणे यांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर सोनवणे हे भाग्यश्री हिच्या वडीलांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले. खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यात नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दिवसभराच्या गोंधळानंतर रात्री एमआयडीसी पोलिसांनी भाग्यश्रीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन पतीसह तिघांविरोधता खूनाचा गुन्हा दाखल केला.

पतीच्या वाढदिवशी पत्नीचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार असे की, नेहरु नगरात पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील हे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे शोध विभागात कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांचे अंगरक्षक होते. 28 रोजी वाढदिवस प्रशांत यांचा वाढदिवस होता. मध्यरात्री त्यांनी पत्नी भाग्यश्री सोबत केक कापला अशी माहिती मिळाली यानंतर इतर कुटुंबिय झोपलयनंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास भारती उठली व तीने दुसर्‍या खोली जावून गळफास घेतला अशी माहिती सासरच्यां मंडळींनी भाग्यश्री हिच्या कुटुंबियांना दिली होती. आईचा मृत्यू , वडीलांविरोधात खुनाचा गुन्हा आता अडीच वर्षीय वेदांतच्या भविष्याचे काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.