भुसावळ प्रतिनिधी दि 17
सद्य:स्थितीत कार्यरत जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटीलांनी कार्यतत्परतेने यांचे आपल्या गावातील सर्व कामकाजाकडे लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करून अवैध धंद्यावर आळा घालवा, असे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
पोलीस पाटीलांचे एकदिवसीय प्रशिक्षण – जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर व फैजपूर या उपविभागातील नवनियुक्त पोलीस पाटील व यापूर्वी कार्यरत पोलीस पाटीलांचे काल (16 सप्टेंबर) एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले. जिल्ह्यात 344 पोलीस पाटील पदांची भरती यशस्वीपणे करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी स्तरावर त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे
जिल्ह्यात 13 ऑगस्ट रोजी पोलीस पाटील पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आलेली असून संपूर्ण भरती प्रक्रिया उपविभागीय स्तरावर पूर्ण झालेली आहे. नवनियुक्त पोलीस पाटील यापूर्वीच कर्तव्यावर रुजू झाले आहेत.