पोलीस पूत्राचा प्रामाणिकपणा ; 12 हजाराचा मोबाईल केला परत

0

जळगाव- मु.जे.महाविद्यालयाच्या मागील बाजूस रस्त्यावर विशाल कॉलनी येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पुत्र खुशाल धनराज वाघ या तरुणाला 12 हजाराचा मोबाईल सापडला होता. त्याने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून मोबाईलचा मालक नाजीम सलीम तडवी रा. वाघनगर यास मोबाईल परत करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.एकीकडे मोबाईल चोरीच्या घटना व दुसरीकडे प्रामाणिकपणाने मोबाईल परत केल्याच्या घटनेने माणुसकी आजही शिल्लक असल्याचा प्रयत्य आला आहे.

वाघनगर येथे सलीम तडवी हे पोलीस कर्मचारी राहतात. त्यांचा मुलगा नाजीम तडवी एका झोमॅटो या कंपनीत खाद्य डिलेव्हरी करण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. सर्वत्र शोधाशोध घेवून तो सापडला नव्हता. याच रस्त्यावरुन खुशाल धनराज वाघ हा तरुण दुचाकीने जात होता. त्याला रस्त्यावर पडलेला मोबाईल दिसला. त्याने तत्काळ रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. येथील ठाणे अंमलदार अनिल फेगडे यांनी मोबाईलमधील संपर्क क्रमांकावरुन मालकाचा शोध घेतला. त्यात मोबाईल नाजीम तडवी यांचा असल्याचे समोर आले. फेगडे यांनी त्यांना संपर्क करुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात येण्याचे सांगितले. व खुशाल वाघ याच्या तरुणाच्या उपस्थित सापडलेला मोबाईल परत केला. आज काल दहा रुपये हरविले लवकर सापडत नाही तोच 12 हजाराचा मोबाईल सुखरुप परत मिळाल्याने नाजीमने खुशालसह पोलीस कर्मचार्‍यांचे आभार मानले आहे.