पोलीस बळाचे असेही शौर्य

0

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेे. विजय जाधव विधान भवन गेटवर निदर्शनें करणार होते, त्यापूर्वीच मध्यरात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आझाद मैदानात पोलिसांच्या देखरेखीत निदर्शने सुरु आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या शेतकरी अधिवेशनात विजय जाधव अस्थीकलश घेऊन सहभागी झाले होते. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते विधान भवन गेटवर निदर्शनं करणार होते. नागपुरात त्यांना स्वीयसहाय्यकाने गडकरींना भेटू दिले नव्हते.