पोलीस मुख्यालयात वसाहतीजवळ पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

0

जळगाव : पोलीस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या अधिकारी निवासस्थानाच्या मुख्य गेटजवळ बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोपाल रामचंद्र सोनवणे (वय-४०) रा. पोलीस वसाहत या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत्युचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

गेल्या सहा महिन्यांपासून गोपाल सोनवणे पोलीस सेवेतून निलंबित होते. आज सकाळी वाजेच्या सुमारास अधिकारी निवासस्थानाच्या आवारात असलेल्या शौचालयाच्या चेंबरवर बेशुध्दावस्थेत आढळून आले. यानंतर शुध्दीवर आल्यानंतर काही अंतरावर खाली पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.

पोलिस अधिक्षकांसह अधिकार्‍यांनी घेतली माहिती
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देवुन माहिती जाणुन घेतली.