पोलीस वसाहतीतील रहिवाश्यांचा पाणी प्रश्नाबाबत आंदोलन

0

पुणे –महापालिका प्रशासनाने पोलिस वसाहत शिवाजी नगर येथील पाणी प्रश्न अद्याप सोडविलेला नसल्याने याबाबत पोलिस मित्र संघटना व पोलिस वसाहतीतील महिला यांनी आंदोलन केले. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाणीपुरवठा केला नाही तर पुढील महिन्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असे पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी दिला आहे.