नवापूर। येथील उद्योजक तथा नगरसेवक आरीफ इब्राहिम बलेसरिया यांच्या पौल्ट्रीफार्ममध्ये झालेली चोरी अवघ्या चार दिवसात उघडकीस आणण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना यश आले असुन ते आल्यापासून शहरातील घरफोडी, मोटारसायकल चोरी आदि गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे या पोल्ट्री फॉर्म चोरी प्रकरणी चरणमाळ येथील तीन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडुन रोख रक्कमेसह सीसीटीव्हीचा डिव्हिआर हस्तगत केला आहे. नागपूर सुरत महामार्गावरील नवापूर वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोरील पोल्टी फॉर्म वर 7 जुलै रोजी चोरी झाली होती. त्याबाबत नवापूर पोलीसात आरीफ बलेसरिया यांनी फिर्याद दिली होती. पोल्टीफॉर्मचा टेबलच्या कप्यातुन 25 हजार रुपये रोख, व 28 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डिव्हिआर यंत्र चोरीस गेले होते. सायंकाळी 7 वा. कार्यालय बंद करून बलेसरिया व मॅनेजर घरी गेले होते.
चोरीबाबत काही तासातच तपास
8 जुलै रोजी सकाळी सात चा सुमारास पोल्ट्री फॉर्म चा वॉचमन व मदरशाचा मौलाना यांनी कार्यालयाचा कडीकोयंडा तुटला आहे. अशी माहिती दिली. तसेच कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्याचा वायरी तुटलेल्या दिसल्या माहिती मिळताच बलेसरिया यांनी घटनास्थळी धाव घेवून कार्यालयाचा दरवाजा उघडला व आत जाऊन खाञी केली चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. माञ मॅनेजर बाहेर गावी गेला असल्याने किती रक्कम चोरीस गेली हे निश्चित नसल्याने मॅनेजर आल्यावर नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. यात रोख पंचवीस हजार रुपये रोख आणि सीसीटीव्ही डिव्हिआर मशीन चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले त्याबाबत नोंद करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी या चोरीबाबत काही तासातच तपास लावला व चोरीस गेलेला मुदेमाला सह चरणमाळ ता नवापूर येथील विनोद मनोहर वसावे वय 31 व समुवेल रामजी भील वय 26 आलीया रामजी भील वय 24 या तिघांना गिरफ्तार करण्यात आले आहे.