कर्जत । पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे 1996-97च्या वर्षी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करताना हरेश वेहेले व नितीन वेहेले या विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली तसेच साकीब बोंबे याने या शाळेकरिता एक ई-क्लासची सुविधा देत असल्याचे जाहीर केले.
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक जी. डी. एडवी यांनी या माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. साकीब बोंबे यांनी या भागात हॉस्पिटल उभारून रुग्णांची सोय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या गुरुजनांनी त्यावेळी केलेली शिक्षा ही आपल्या हितासाठीच होती. त्यामुळे ही शिक्षा आम्ही प्रसाद म्हणून स्वीकारली, असे म्हणून शिक्षेला अनुमोदन दिले.