जळगाव। जिल्ह्यातील शाळांना पुरविण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आढळून आला आहे. याबाबत सर्व शाळांमध्ये चौकशी सुरु आहे. पुरवठादाराकडून सर्रासपणे पोषण आहार कराराचे उल्लंघन सुरु आहे. चक्क स्वतःच्या मालकीच्या वाहनातुन पोषण आहार पुरवठा करत असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हाधिकारी पोषण आहार संदर्भात दखल घेऊन पुरवठादारावर कारवाई करतील या अपेक्षेने जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे गुरुवारी 20 रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. पोषण आहार पुरवठादाराला दिलेली मुदतवाढ रद्द करुन मक्ता रद्द करण्याची मागणी त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे. त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माधुरी अत्तरदे आदी तक्रार करणार आहे.