पो.नि.विकास वाघ यांची तडकाफडकी बदली

0

अमळनेर । गेल्या दोन वर्षात ढासळलेली अमळनेरची कायदा सुव्यवस्था आणि काही दिवसांपूर्वी निर्माण झालेली भयावह अवस्था पाहता व ताज्या झालेल्या खून प्रकरणातील आरोपीचा छडा लावू न शकल्याने आज सकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अनिल बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज ते सायंकाळी पदभार घेणार असून त्यांची डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांची कामगिरी नक्षलवादी भागात कर्तव्य बजावत असतांना माओवादी संघटनेच्या प्रमुखावर गुन्हा नोंदवून थेट शिक्षाहोईपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता अमळनेरची कायदा सुव्यवस्था चोख बजावण्यात ते कमी पडणार नाहीत. आणि त्यांच्यासमोर अमळनेरातील शिक्षक दीपक पाटील खून प्रकरणातील आरोपीचा मुसक्या आवरण्यासाठी मोठे आव्हान असून त्याची खूनातील आरोपीची ओळख पटणार आहे. याची प्रतीक्षा अमळनेरकर नागरिकांना आहे.