प्योरसाइटने लॉन्च केला वाय-फाय कनेक्टेड व्हॅक्यूम रोबो रूम्बा ६७१

0

मुंबई: भारतात आयरोबोट उत्पादनांचे अधिकृत विक्रेते प्योरसाइट सिस्टम्स प्रा. लि. यांनी रूम्बा ६७१ हे आपले नवीन रोबो व्हॅक्यूम क्लीनर भारतात लॉन्च केले आहे. रूम्बा ६७१ हे एक उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि वाय फाय कनेक्टेड रोबोटिक उपकरण आहे, जे तुमच्या घरातील, कोचाखाली, पलंगाखाली यांसारख्या पोहोचण्यास अवघड अशा जागी सहज पोहोचते आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात मदत करून घर स्वच्छ रखण्यास हातभार लावते. फक्त ‘क्लीन’ बटण दाबले की,रूम्बा ६७१ फरशी साफ करू लागतो. हे स्मार्ट उपकरण अमेझॉन.इनवर किंवा आयरोबोटच्या भारतातील वेबसाइट मार्फत आणि आयरोबोटच्या ऑफलाइन रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. रूम्बा ६७१ची एमआरपी ३७,९००रु आहे परंतु त्यांची लॉन्च किंमत २९,९०० ठेवण्यात आली आहे आणि हे रूम्बा व्हॅक्यूम रोबो प्रकारात सर्वात कमी किंमतीचे उपकरण आहे.

रूम्बा ६७१ मध्ये एक खास रचनेचा किनारी साफ करणारा ब्रश आहे, ज्यामुळे एरवी नजरेतून निसटून जाणा-या जागी राहिलेली धूळ व माती देखील साफ होते. या उपकरणासोबत एक घरात राहणारे चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याही टर्बो चार्जिंग क्रेडल आहे, जेथे ते आपणहून येऊन थांबते आणि तुमच्या घरात ते कुठेही पडलेले दिसत नाही. रूम्बा ६७१ मध्ये एक ३-टप्प्यांची सफाई प्रणाली आहे, ज्यात एक शक्तीशाली सक्शन आहे ज्याच्यामुळे फरशी व्यवस्थित साफ होण्यास मदत होते. ज्या जागेत वावर अधिक असल्यामुळे अधिक सखोल सफाईची गरज असते, त्या जागा ओळखून हे उपकरण तेथे अधिक सखोल सफाई करते. याच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये डर्ट डिटेक्ट टेक्नॉलॉजी, आयअडॅप्ट नेव्हीगेशन, 3-स्टेज क्लीनिंग, आयरोबोट होम अॅप यांचा समावेश आहे. भारतात रूम्बा ६७१ला रोबो व्हॅक्यूमवर २ वर्षांची आणि बॅटरीवर १ वर्षाची वॉरंटी दिलेली आहे.