प्रकाशा-बुराई उपसा योजनेस मान्यता

0

नंदुरबार । पर्यटन व रोहयो तथा नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 11010 लाख रूपायंच्या किंमतीस मूळ प्रशासकीय मान्यता दिली असून या कामाचे सुधारीत अंदाजपत्रक (439.32 कोटी) राज्यस्तरीय तांत्रिक सल्लगार समितीस सादर करण्यात आले आहे, अशी माहिती नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जोशी यांनी दिली आहे.

22 योजनांची दुरूस्ती
23 ऑगस्ट, 2016 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार तत्वत: मान्यता प्राप्त झाली आहे. 22 उपसा सिंचन योजने बाबत सद्य:स्थिती :-तापी नदीवर बांधण्यात आलेल्या सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधील पाणी उपसा करुन सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने 22 सहकारी (अस्तित्वातील) उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 8 व नंदुरबार जिल्हयातील 14 अशा 22 राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना 6 जून, 2016 अन्वये रु. 41.78 कोटी किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

33 गावांना लाभ
धुळे जिल्ह्यातील 8 योजना शिंदखेडा तालुक्यातील असून 26 गांवाना लाभ मिळणार आहे. या योजनामधून 5223 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 33.80 दलघमी पाणी वापर सुरु होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 14 योजना असून शहादा तालुक्यातील 8 व नंदुरबार तालुक्यातील 6 योजना असून 33 गावांना लाभ मिळणार आहे. या योजनामंधून 9190 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 56.70 दलघमी पाणी वापर सुरु होणार आहे.