नंदुरबार : प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजना लवकर सुरू व्हावी या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे नंदुरबार, दोंडाईचा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
शिरीष चौधरी यांनी ही आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला,प्रकाशा बुराई योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. ते लवकर पूर्ण व्हावे यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.