प्रचार संपताच अमित शहा सोमनाथचरणी; विजयासाठी घातले साकडे

0

सोमनाथ: लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार काल संपला त्यानंतर आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथे जाऊन सपत्नीक महादेवाची पूजा केली. त्यांनी देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी यासाठी साकडे घातले. काल प्रचार सभा थंडावल्या असून, उद्या होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाकडे सगळ्या पक्षांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोरटी सोमनाथ येथे जाऊन पूजा केली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केदारनाथला गेले आहे. देशाचे लक्ष या दोन्ही नेत्याकडे आहे. प्रचारसभेत प्रत्येक पक्षाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले असून उद्या उमेदवारांचे भवितव्य मशीन मध्ये बंद होणार आहे. त्यांचा निकाल २३ में ला लागणार आहे.