पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी भक्ती – शक्ती चौक निगडी येथे प्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर गीतांचा भव्य कार्यक्रम झंडा उंचा रहे
हमारा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा ढोर यांच्या हस्ते रविवारी सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती राहिल. तर खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, पिं.चि. नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, स्थानिक नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, नगरसदस्या शैलजा मोरे, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती चौक येथे 160 मीटर इतक्या उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आलेला आहे. दरवर्षी या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यावेळी मोठ्या लोकसंख्येने नागरिक उपस्थित असतात. यावेळेस नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल व त्यांचे सहकारी महेश गायकवाड, पृथ्वीराज इंगळे हे देशभक्तीपर गीतांचा झंडा उंचा रहे हमारा हा भव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या लोकप्रिय मालिकेचे शिर्षक गीत गायक संदीप उबाळे हे आपली कला सादर करणार आहेत. स्थायी समिती सभेत या कार्यक्रमासाठी येणार्या खर्चास सभापती विलास मडिगेरी यांनी मान्यता दिलेली आहे. तसेच या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.