जळगाव । जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांचा प्रजासत्ताकदिनी पोलिस कवायत मैदान येथे शासकिय ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री ना. अर्जून खोतकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित होती.
विनोद अहिरे हे गेल्या 15 वर्षापासून जळगाव जिल्हा पोलिस दलात कराटे, स्केटिंग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्यस्तरावर व राष्ट्रीय पातळीवर कराटे, स्केटिंग या खेळात प्रविण्य मिळवलेले आहे. त्यांनी 2015 मध्ये लददाख येथे झालेल्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले असून ते महाराष्ट्र पोलिस दलाचे पहिले आईस हॉकीपटून आहे. आत्तापर्यंत त्यांना पोलिस खात्यांतर्गत 240 बक्षिसे मिळालेले आहे.