नवीदिल्ली: भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये येत असतांना भाजपने त्याची दखल घेतली असून वाचाळवीर नेत्यांना करणे दाखवा नोटीस पाठविली आहे. वादग्रस्त वक्तव्ये शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहेत. तसेच शिस्तपालन समितीने या नेत्यांना दहा दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपच्या भोपाल मधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्या प्रकरणी मोठे वादंग उठले होते. या वरून भाजपवर टीका होत आहे. दरम्यान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्षाशी त्याचे काहीही संबध नाही असे म्हटले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे विषयी नथुराम हे देशभक्त होते, आहे आणि राहतील असे विधान केले होते. या विधानावरून त्यांच्यावर टीका होत असताना केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी त्याचे समर्थन केले आहे. यावरून पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सांगितली जात आहे. गोडसेबद्दल आजची पिढी चर्चा करत आहे, याचा मला आनंद होत असून, ही चर्चा व्हायला पाहिजे असेही हेडगे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.