नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. साध्वी यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी या विधानावरून भाजपावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, साध्वी यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही असे मोदींनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.
दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते.