प्रणव मुखर्जींच्या फोटो सोबत आरएसएसकडून छेडछाड

0

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी तसेच काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आरएसएसवर आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळच्या त्यांच्या फोटोमध्ये छेडछोड करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही फोटोंत प्रणव मुखर्जी संघ नेते आणि कार्यकर्त्यांप्रमाणे अभिवादन करताना दिसत आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे होते. यावर शर्मिष्ठा यांनी निशाणा साधला आहे.

शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्यास विरोध दर्शवला होता. सोशल मीडियावरूनही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.