प्रतापराव पाटील यांना ‘शिक्षण तपस्वी‘ पुरस्कार जाहीर

0

भातखंडे । कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील यांना पिंपरी चिंचवड पुणे येथील पाचव्या अहिराणी कस्तुरी साहित्य कला क्रिडा मंच ह्या संस्थानी आयोजीत केलेल्या साहित्य संमेलनात शिक्षण तपस्वी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रतापराव पाटील यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शाखा या डिजीटल केलेल्या आहेत. तसेच शालेय प्रशासनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या हालचालींवर आता लक्ष ठेवण्यासाठी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

शाळा ‘अ’ वर्ग करण्याचा संकल्प
सहशालेय उपक्रम या संस्थे अंतर्गत साजरे केले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. ते जिल्ह्यातील एक उपक्रमशील संस्था चालक म्हणून परिचित आहेत. शिक्षणाचा दर्जा टाकावा म्हणून ते स्वतः शालेय तपासणी करतात. याचीच दखल घेऊन पुण्याच्या अहिराणी कस्तुरी साहित्य कला क्रिडा मंचने त्यांची शिक्षण तपस्वी हा पुरस्काराठी निवड केली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात लवकरच आपल्या संस्थेला शाळा सिद्धी अंतर्गत ‘अ’ वर्ग करण्याचा संकल्प त्यांनी बोलतांना व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे