प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे पर्यावरणाचा जागर : एक हजार वृक्षांची होणार लागवड

0

भुसावळ- शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सर्वत्र वृक्ष लागवड केली जात आहे. या उपक्रमात शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळानेही सहभा घेतला असून एक हजार झाडांची लागवड करण्यात येत असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या. तालुक्यातील साकेगावसह वराडसीम व गोजोरे येथे आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सरपंच संगीता भोळे, शेतकी संघ संचालिका माधुरी पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाटील, संजय पाटील, कुरकुरे, अनिल पाटील, महेंद्र कुंभार, प्रमोद सपकाळे, दिलीपसेन पाटील, गजानन सपकाळे, धनराज भोई, सुरेश पाटील, माणिक पाटील, परशुराम वाघ आदींची उपस्थिती होती.