जीएसटी आणि नोटाबंदीचा ’इम्पॅक्ट’
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करांच्या (जीएसटी) अंमलबजावणीचा परिणाम आता भारतीय महसूल खात्यावर होत असल्याचे दिसत आहे. नोटाबंदीनंतर देशात जीएसटी लागू केल्यानंतर एका वर्षात सरकारकडे जमा होणार्या प्रत्यक्ष करामध्ये तब्बल 18 टक्क्यांची भरघोस वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले. तसेच यंदा करदात्यांमध्येदेखील विक्रमी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 2016-17 च्या आर्थिक वर्षात देशात 5.43 कोटी इतका आयटी रिटर्न्स जमा झाला होता, परंतु जीएसटी लागू केल्यानंतर यंदा तो 6.84 कोटींवर जाऊन पोहोचला असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
करदात्यांमध्येही झाली वाढ
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले, की 2017-18 च्या आर्थिक वर्षामध्ये केंद्राकडे तब्बल 10 लाख 2 हजार 607 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष कर जमा झाला आहे, असे जेटली म्हणाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष करामध्ये झालेली ही सर्वात मोठी असून, कर जमा होण्याचे हे प्रमाण तब्बल 18 टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या सरकारने देशाच्या आर्थिक हितांसाठी अनेक निर्णय घेतले. त्यामुळेच आज देशातील करदात्यांची संख्यादेखील वाढ असल्याचे जेटली यांनी सांगितले. याच बरोबर जीएसटीचादेखील अत्यंत सकारत्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवर आणि आयटी रिटर्न्स भरणार्यांवर झाला असून, गेल्या वर्षभरात आयटी रिटर्न्समध्ये 1 कोटीहून अधिकची वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.