प्रत्येकाने समाजाला काहीतरी दिले पाहिजे

0

तळेगाव दाभाडे : प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केवळ घेण्यापेक्षा आपण समाजाला काहीतरी दिले पाहिजे अशी सवय लाऊन घ्यायला हवी, असे प्रतिपादन सदगुरू प्रल्हाददादा वामनराव पै यांनी केले. जीवन विद्या मिशन आणि उपनगराध्यक्ष सुनील शेळके मित्र परिवारातर्फे तळेगाव येथील जीवन विद्या मिशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन केले.

यांची होती उपस्थिती
महोत्सवाचे उदघाटन खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिगंबर भेगडे, उद्योजक शंकरराव शेळके, संयोजक सुनील शेळके, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, सुरेशभाई शहा, राजाराम राक्षे, पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील, गणेश भेगडे, सुशील सैंदाणे, प्रशांत ढोरे, आजी माजी नगरसेवक, वामनराव पै यांचे शिष्यगण व श्रोतागण मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाला दिशा देणारे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. तर चांगल्या विचारातून चांगली माणसे जोडली जातात असे खासदार बारणे यांनी म्हणाले.

मानपत्र प्रदान
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे सदगुरू प्रल्हाददादा वामनराव पै यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्य्क्ष सुनील शेळके, गटनेते सुशील सैदाणे, गणेश खांडगे, अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे, नीता काळोखे आदींच्या हस्ते मानपत्र प्रदान केले. मानपत्र वाचन पत्रकार अमीन खान यांनी केले. सूत्रसंचालन संतोष तोतरे यांनी केले.