जळगाव । समाज ही संकल्पना प्रत्येक व्यक्तिच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. समाजाशिवाय कोणत्याही घटकाचा विकास शक्य नाही. प्रत्येक व्यक्तीला घडविण्यामागे समाजाचे फार मोठे योगदान असते. व्यक्तीमत्व विकास घडवून आणून त्याला पुढे नेण्यात, त्याला मोठ करण्यात सर्वात मोठी जबाबदारी समाज पार पाडत असते असे प्रतिपादन महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शहरातील कांताई सभागृहात दिपस्तंभ फाऊंडेशनतर्फे डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिपस्तंभ पुरस्काराचे वितरण करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, भरत अमळकर, चंद्रकांत केले, पुखराज पगारीया, डॉ.राजेश डाबी, यजुर्वेेद्र महाजन, प्रज्ञाचक्षू विद्यार्थी प्रतिनिधी सविता निकम आदी उपस्थित होते.