प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी विविध योजनांच्या जत्रेचे आयोजन करावे

0

चाळीसगाव । जिल्हयातील सामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ द्यावयाचा असेल तर अशा स्वरुपाची जत्रा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात आयोजित करावी असे खासदार ए.टी. नाना पाटील यांनी सांगितले. शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा आज समारोप व बक्षिस वितरण खासदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, जि.प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पं.स. सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, संगांनि योजनेचे अध्यक्ष के. बी. साळुंखे, नगराध्यक्षा आशाताई चव्हाण यांच्यासह जि.प., पं.स.चे सदस्य आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे – आमदार उन्मेश पाटील
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यातली कल्पनाशक्तीला चालणा देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 41 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मुलांनी 750 विद्यार्थी विद्यार्थीनींनी भाग घेतला. ही मुलेच भारताची खरे भविष्य आहेत. या मुलांची क्षमता, त्यांचा दृष्टीकोन इतरांपेक्षा वेगळा आहे. जो इतरांपेक्षा वेगळी पावले टाकतो तो जीवन जगतो. या विज्ञान प्रदर्शनात भाग घेवून ज्ञानाला प्रोसेस करण्याचे काम या मुलांनी केले आहे. या प्रदर्शनातले चार दिवस जीवनात वेगळे घेऊन जाणार आहे. विद्यार्थ्यांची ही दृष्टी त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी निर्माण केली आहे. या विद्यार्थ्यांकडून हे ज्ञान घेतले तर जीवनात येणार्‍या अडचणींवर मात करता येईल. ग्रामीण भागातील ज्ञान पुढे आणण्याचे काम या विज्ञान प्रदर्शनातून करण्यात आले आहे. शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमासाठी वेगवेगळया समित्या तयार करण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांसह परिक्षकांचा सत्कार
या कार्यक्रमात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पांचे परिक्षण करणारे परिक्षकांचा सत्कार खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या प्रदर्शन ज्या विद्यार्थ्यांनी चांगले प्रोजेक्ट सादर केले त्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस विज्ञान प्रदर्शनास आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.