प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार – आशुतोष राणा

0

मुंबई : काही दिवस पूर्वी नसीरुद्दीन शाहने एक वक्तव्य  केले होते. देशात माणसाच्या जीवापेक्षा गाईचा जीव अधिक महत्त्वाचा आहे, असे ते बोलले होते. अनेक कलाकारांनी त्यांना विरोध करत नाराजी व्यक्त केली. मात्र, आता अभिनेता आशुतोष राणा यांनी शाहांची पाठराखण करत प्रत्येकाला आपले विचार आणि मत मांडण्याचा अधिकार आहे, असे बोलले.

आपल्या मित्रांनी किंवा इतर बांधवांनी जर एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं तर ते केवळ ऐकून न घेता त्यावर विचार करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.