प्रत्येक गावात एक तरी शकुनी मामा

0

यावलला राज्यमंत्री गुलाबराव पाटील ; कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्‍यांना खोचक टोला

यावल : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व आम्ही तिकडे वर चहा सोबत पितो मात्र कार्यकर्ते उगाच आपले अस्तित्व दाखवण्याकरीता खाली का भांडतात, असे सांगत तेव्हा असे भांडण कुणी मनावर घेवु नये कारण ‘प्रत्येक गावात एक तरी शकूनी मामा’ असतोच, असा खोचक टोला या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्‍या नगरसेवकांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मारला. शनिवारी रात्री यावल शहरात विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बारी वाडा चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत लव्ह मॅरेज तुटले
राज्यमंत्री पाटील म्हणाले की, खासदार रक्षा खडसे या खासदारकी निवडणुकीत जिंकून येण्यासाठी मी 50 सभा घेतल्या तर विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची फारकत झाल्याने ‘लव्ह मॅरेज तुटलं’ आहे. शिवसेना पक्ष हा मुस्लिम विरोधी नसून विचारांशी बांधीलकी असलेला पक्ष आहे. सर्व सामान्यांना न्याय देऊन लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देणारा पक्ष आहे तेव्हा सर्वसामान्यातून येणार्‍या व्यक्तीची समाजाप्रति बांधीलकी असते व विकासा करीतातो झटतो, असे त्यांनी नमूद केले.

या कामांचे झाले उद्घाटन
शहरात पालिकेच्या वतीने विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपुजन सोहळा सहकार पणन राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी पार पडला. सुरुवातीला नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य इमारतीचे पहिल्या मजल्यावर हॉल व वर्गखोल्या बांधकामचे भूमिपूजन नगराध्यक्ष सुरेखा कोळी व शरद कोळी यांच्या हस्ते झाले तर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या हॉलचे भूमिपूजन आमदार हरिभाऊ जावळे व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्चा हस्ते करण्यात आले. अक्सा नगर भागातील खडीकरण झालेल्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होवून शिवसेनेच्या शहरातील विविध शाखांचे अनावरण करण्यात आले.