शहादा। श हरातील तालुका क्रीडा संकुल लोकार्पण सोहळ्या रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हस्ते करण्यात आला. जयकुमार रावल यांनी बोलताना सांगितले की हि योजना बर्याच वषार्ंपासुन प्रलंबीत होती. तब्बल 15 वर्षानंतर ही योजना मार्गी लागली आहे. आता योजना पुर्ण झाली पण जबाबदार्या वाढल्या आहेत. प्रत्येक मुला मुलींच्या दोन तास खेळण्याचा अधिकार आहे. ईलेक्ट्रॉनीक युगात खेळाकडे दुर्लक्ष मोबाईलला जास्त महत्व प्राप्त झाल्याची खंत त्यानी व्यक्त केली.
चांगले खेळाडू घडवा : 86 लाखाचे संकुल बांधुन झाले. परंतु खेळाचे साहित्य पुर्ण नाहीत ते आणण्यासाठी 5 लाखापासुन ते 40 लाखापर्यंत निधी उपलब्ध करुन या क्रीडा संकुलाला मदत करण्याचे काम करेन असे जयकुमार रावल यांनी जाहीर केले. ऑलंपीक विषयी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले राज्य शासनाने 25 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे की जो राज्यातील 20 निवडक विध्यार्थ्यावर खर्च केला जाणार आहे. म्हणुन शहरातुन तालुक्यातुन चांगले खेळाडु घडविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केला.
पुरस्कारप्राप्तांचा सत्कार
साधारण 2.5 हेक्टर जागेत 86 लाख रु खर्च करुन 200 मी. च्या ट्रॅक व स्टेडियम बनविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यानी दिली.यावेळी ज्या विध्यार्थी सुवर्ण, सिल्व्हर, ब्रांझ पदक प्राप्त केले आहे त्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन विष्णु जोंधळे यानी तर आभार तालुका क्रिडाअधिकारी एस. व्ही. ढाकणे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी खा. हिना गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटिल, जिल्हाधिकारी कलशेट्टी, नगरसेवक रविंद्र जमादार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत सातारकर जिल्हा क्रिडाअधिकारी घनश्याम राठोड तहसीलदार मनोज खैरनार माजी जि. प उपाध्यक्ष मुन्नादादा रावल जि. प. सदस्य अभिजीत पाटील भा. ज. पा. तालुका अध्यक्ष किशोर पाटील शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे दिनेश खंडेलवाल. आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर जेलसिंग पावरा प. स. सभापती दरबारसिंग पावरा आदी उपस्थित होती.