मातृमंदिराचा उदघाटन सोहळा उत्साहात
निगडी : पूर्वी सांस्कृतिकदृष्ट्या एकसंघ, अखंड भारत होता. काही दुष्प्रवृत्तींमुळे त्याचे विभाजन झाले. पुन्हा आपल्या भारताला सांस्कृतिकदृष्ट्या अखंड करायला हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अखंड भारत रुजवायला हवा, असे प्रतिपादन स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केले. येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश स्कूल मध्ये चार दिवसीय मातृमंदिर उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. मातृमंदिराचे उदघाटन रविवारी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बुलढाणा अर्बन क्रेडिट को. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, डॉ. पुषोत्तम राजीमवाले, दादा वेदक, संस्थापक यादवेंद्र जोशी, मदनलाल कांकरिया, जयकुमार चोरडिया, मदनलाल कोचर, यशवंत लिमये, अध्यक्ष कांतीलाल खिंवसरा, ज्ञानप्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, नगरसेवक अमित गावडे, दत्ता साने, संगीता ताम्हाणे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, प्रमोद देशपांडे, धनंजय चंद्रात्रे, गुलाबराव सोनवणे, नवनाथ शिंदे, सुनील आंबले, राजू म्हेत्रे, विजय ओझरकर, पंकज भालेकर, सुरेश म्हेत्रे, भागू धामणकर, पल्लवी गोपाळे, वंदना गोपाळे, कांता अरगडे, गणेश वाघुले, तुषार वाघुले, गिरीश लुणावत, राकेश सोनिगरा, विनय गुप्ता, शिरगाव, चिखली येथील शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
पालक-विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर
पूर्वी ज्ञानेश्वर म्हेत्रे, चंदनमल दर्डा यांच्या पत्नी कांताबाई दर्डा, यशवंत लिमये, अशोक कटारिया, महेंद्र कोठारी, निर्मला खिंवसरा यांनी संस्थेच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मातृमंदिर उदघाटन सोहळ्यात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी विविध विषयांवर प्रकल्प सादर केले. प्रकल्प सादरीकरणाचा बक्षीस वितरण समारंभ देखील स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते यावेळी पार पडला.
राष्ट्रविकासाबरोबर विस्तार महत्वाचा
स्वामी गोविंद देवगिरी महाराज पुढे म्हणाले की, पृथ्वीवर मानव हा एकमेव प्राणी आहे, जो ज्ञानाचे संक्रमण करतो. ज्ञानापेक्षा अधिक पवित्र काहीही नाही. ज्ञान हेच सर्वात मोठे धन आहे. सध्या सर्वत्र केवळ राष्ट्रविकासाबद्दल बोलले जात आहे. राष्ट्रविकासा बरोबर राष्ट्रविस्ताराला देखील महत्व द्यायला हवे. ज्ञानी पिढी घडवून उपयोग होणार नाही. मिळवलेले ज्ञान योग्य ठिकाणी वापरण्याची क्षमता देखील विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायला पाहिजे. राष्ट्रीयत्वाचा गौरव व्हायला हवा. राष्ट्रीयत्वाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण व्हायला हवी. त्यासाठी सर्व महापुरुषांचा आदर आणि सन्मान करा. बुलढाणा अर्बन क्रेडिट को. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले की, माणसाला ज्याप्रमाणे गती मिळण्यासाठी चरण आवश्यक आहेत, त्याप्रमाणे प्रगती करण्यासाठी शुद्ध आचरणाची गरज आहे.