पिंपरी : प्रत्येक समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. सध्या स्पर्धेचे युग असून समाजातील प्रत्येक गरजू घटकाला यात सामावून घेणे आवश्यक आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनच्या वतीने नुकताच महिला दिन पुरुषांनी साजरा केला. त्यावेळी महापौर काळजे बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव यावेळी करण्यात आला. उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी-चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, कार्याध्यक्ष राकेश नायर, सरचिटणीस सुनील गोपीनाथ, भालचंद्र शेट्टी, राकेश शेट्टी, कार्तिक कृष्णा, गणेश आंचन, प्रसाद नायर, राजेंद्र प्रसाद यांच्यासह दक्षिण भारतीय नागरिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
पंचरत्न पुरस्काराने सामाजिक क्षेत्रातील भारती शेट्टी, सामाजिक आणि राजकीय दिघा उदयकुमार, कला क्षेत्रातील सुजा दिनकर, वैद्यकीय डॉ. प्रिया नायर आणि शैक्षणिक दीपा बसीन यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. या दक्षिण भारतीय समाजाचे संघटन होण्यासाठी एकत्रित आले पाहिजे. महापालिकेच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी महापौर काळजे यांनी दिले.