नवापूर । नवापूर या आदिवासी क्षेत्रात आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती,शेतमजुरी असुन या कष्टकरी व श्रमिक लोकांचा खरा सोबती सर्जा राजाचा दिवस बैल पोळा हा सण सोमवारी येत आहे. त्यानिमित आपल्या लाडक्या बैलांना सजविण्यासाठी नवापूर शहरातील लाईट बाजार भागात खरेदी करतांना शेतकरी राजे दिसत आहे..
शहरात प्रथमच पोळा निमित्त मोठ्या प्रमाणावर बाजार भरला आहे. त्यानिमित्त खरेदीसाठी एकच गर्द्दी होत आहे. एवढा मोठा बाजार प्रथमच भरल्याने आश्चर्य व्यक्त होत असुन जनशक्तीने आज या बाजाराकडे लक्ष वेधुन पोळा बाजाराची छायाचित्र काढली. इतर जिल्हा व परराज्यातुन बैलांना लागणार्या वस्तु विकणारे व्यवसायिक नवापुर बाजारात दाखल झाले आहेत.