प्रदीपचे राष्ट्रकुलचे तिकीट पक्के

0

गोल्ड कोस्ट । ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा, ज्युनीअर आणि सिनीयर गटाच्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत भारताच्या प्रदीप सिंगसुवर्णपदक पटकावत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्‍चित केले आहे. या स्पधेच्या शेवटच्या पाचव्या दिवशी भारतीय पॉवरलिफ्टर्सनी 34 विक्रम नोंदवले. शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकत आपली मोहीम फत्ते केली.प्रदीपने स्नॅच प्रकारात 147 किलो आणि क्लिन जर्कप्रकारात 195 किलोसह 105 किलो वजनी गटात एकुण 342 किलो वजन उचलले. या दरम्यान प्रदीपने स्नॅच प्रकारात राष्ट्रीय विक्रम ोंदवला. गुरूदीपसिंगने 105 किलोहून अधिक वजनी गटात एकुण 371 किलो (171 किलो आणि 200 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले. गुरूदीपने स्नॅच प्रकारात नवीन विक्रम रचला.

ज्युनीअर गटातील 105 किलो गटात लवप्रीत सिंगने 325 किलोसह ( 150 किलो आणि 175 किलो) सुवर्णपदक जिंकले. तर 105 किलोहून अधिक गटात तेजपाल सिंगने 313 किलो (135 किलो आणि 178 किलो) वजन उचलून कांस्यपदक मिळवले. पौर्णिमा पांडेने ज्युनिअर महिला गटातील 90 किलोहून अधिक वजनी गटात रौप्यपदक जिंकले. तिने स्नॅच प्रकारात 94 किलो आणि क्लिन जर्क प्रकारात 121 किलो असे एकुण 215 किलो वजन उचलले.