प्रदीप गारटकर यांचा सोमाटणे येथे सत्कार

0

शिरगाव : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा सोमाटणे येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मावळ तालुका राष्ट्रवादी कोंग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्याचे संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेशअप्पा ढोरे, अशोक बाफना, तळेगावचे नगरसेवक संतोष भेगडे, कार्याध्यक्ष संतोष मुर्‍हे, सुनील दाभाडे आदी यावेळी उपस्थित होते.

जबाबदारी पार पाडणार
यावेळी गारटकर म्हणाले की, माझ्यावर पक्षाने विश्‍वास ठेवून जी जबाबदारी टाकली आहे ती यशस्वीपणे पार पडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यापुढे सर्व तालुक्यांचा दौरा करून प्रत्येकाला विश्‍वासात घेवूनच पुढील रणनीती आखली जाणार आहे. याविषयी बापूसाहेब भेगडे म्हणाले की, येणारी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून व सर्व वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण मावळ तालुक्यात बैठका घेवून राष्ट्रवादी पक्षाचे काम जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचविता येईल याकडे आमचे लक्ष आहे. येत्या काळात आम्ही आमचे काम जास्त तीव्र करून मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.