तळेगावः महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील मानवाधिकार व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप विजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब तथा चंद्रकांत उदुगडे पाटील यांनी प्रदीप नाईक यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. मानवाधिकार संघटना तसेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून नाईक यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.